ज्योतिष’शास्त्र’ म्हणायचे असेल तर Empirical (अनुभवसिद्ध) परीक्षण अपरिहार्य
एकेकाळी मी पण ज्योतिषी होतो. पत्रिका वगैरे बघायचो, लोकांना मार्गदर्शन करायचो. एका ज्योतिषी असण्यापासून ते ज्योतिषाचा टीकाकार होणे या बदलाचे श्रेय माझ्या ज्योतिषशास्त्राच्या Empirical परीक्षणाच्या (Empirical testing) प्रयोगांना द्यावे लागेल. मी जसेजसे हे प्रयोग करत गेलो तसेतसे ज्योतिषविद्येविषयीचे माझे मत बदलत गेले आणि आज मी दहा वर्षांच्या संशोधनानंतर, अनेक प्रयोगांच्या आधारे आणि हजारो पत्रिकांच्या विश्लेषणानंतर असं विश्वासाने म्हणू शकतो की ज्योतिष …